बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा’; संजय राऊतांचा दानवेंवर पलटवार

मुंबई | महाराष्ट्र राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यापासून, राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सतत सुरू असते. याच मुद्यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेतील नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कमी असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हाला अभ्यास शिकवू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या मग आम्हाला शिकवा, असं म्हणत संजय राऊतांनी दानवेंवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची एक बैठक पार पडली. त्यानंतर राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दानवे माझ्या घरापासून दोन पाऊलांवरच राहतात. त्यामुळे त्यांचा क्लास लावून टाकू. मराठा आरक्षणावर आम्ही दानवेंचं कोचिंग करू, असंही राऊतांनी म्हटलं.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज सकाळी माझ्याकडे आले होते. ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहे. त्यावेळी त्यांनी काही कायदेशीरबाबी मांडल्या, त्यावर आम्ही चर्चा केली. त्यामुळे शिकवणी, अभ्यास वैगेरे आम्हाला सांगू नका. ते आम्हाला माहित आहे.  आरक्षण द्या मग आम्हाला शिकवा. नाहीतर आम्हालाही शिकवता येत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून त्यांना 11 मागण्यांचं एक निवेदन पत्र दिलं आहे. त्यामध्ये रेल्वे, मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहेत. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी प्रत्येक खात्यातील खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्यासाठी आजची बैठक झाली असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

…म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

“अहो संजय राऊत… निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात”

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More