Top News

पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

मुंबई | मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही करायला मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर सर्वानुमते पंकजा मुंडे यांना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा, अशी मागणी शिवसेनेनं केलीय. सामनाच्या अग्रलेखात यासंदर्भात भाष्य करण्यात आलंय. 

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची फाईल शोधून तिचा लाल दोरा सोडावा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, नाहीतर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवा, असं अग्रलेखात म्हटलंय. 

दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणतात मुख्यमंत्री रात्ररात्र जागून काम करतात. आता तर मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे. त्यात त्यांनी चुकून डुलकी घेतलीच तर पंकजा मुंडे मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही करतील, असा टोलाही शिवसेेनेनं लगावला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या