ITR भरण्याआधी ही बातमी नक्की वाचा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या नागरिकांचं उत्पन्न करपात्र आहे त्यांना इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणं अनिवार्य आहे.

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्षासाठी ITR फॉर्म जारी केले आहेत. हे आर्थिक वर्ष समाप्त झाल्यानंतर करदाते आयटीआर फाईल करु शकतात.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. जर करदात्याला 31 जुलै पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता आले नाही तर त्याला 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरावा लागेल. या विलंबापोटी त्याला दंड सोसावा लागेल. भूर्दंड म्हणून 5 हजार रुपये द्यावे लागतील.

दरम्यान, आयकर विभागानुसार उशीरा ITR दाखल करत असाल तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्यानंतर पण तुम्ही ITR निश्चित तारखेपर्यंत जमा केला नाही तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-