बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंचा लोकांवर इतका परिणाम झाला आहे की, जो तो फेमस होण्यासाठी सतत व्हिडीओ बनवत असतो. अशातच दिल्लीमध्ये ऑनड्यूटी असणाऱ्या एका पोलीस जोडप्याने एक रोमँटिक व्हिडीओ शूट करुन इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र असं करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

दिल्लीमधील संबंधित जोडप्याने ऑनड्यूटी असताना एका बाॅलिवूड गाण्यावर डान्स केला आणि तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं तर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. मात्र यानंतर दिल्ली प्रशासनाने दखल घेतली. यावेळी डीसीपी उशा रंगानी यांनी अधिकृत नोटीस बजावली आहे.

संबंधित जोडप्याला उशा यांनी अधिकृत नोटीस पाठवली असून यामध्ये ऑनड्यूटी व्हिडीओ बनवण्यामागचं कारण विचारण्यात आलं आहे. एवढंच नाही तर दोघांनाही काही दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळं सर्वांनाच सक्तीनं घरात बसावं लागत आहे. तसेच ज्यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांचे फटके देखील बसले आहेत.

दरम्यान, बेरोजगारी आणि दुसरीकडे पोलिसांचे फटके यामुळं देखील अनेक जण पोलिसांवर नाराज आहेत. त्यामुळं अनेकांनी पोलिसांच्या या व्हिडीओवर टिकेचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी करणयात आली आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी या कारवाईला विरोध केला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच महाराष्ट्र चालेल- अजित पवार

“…म्हणून भाजपला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”

तहान भागवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

बारावी नापास म्हणून ‘खिल्ली’ उडालेल्या मनसे नेत्यानं जिद्धीनं पूर्ण केली पदवी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More