बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हिडीओ व्हायरल झाला अन् पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं, आता कमावतोय महिना 30 लाख

नवी दिल्ली | सोशल मीडिया (Social Media) हे एक असे माध्यम आहे ज्या माध्यमातून दैनंदिन काहीतरी व्हायरल (Viral) होत असतं. व्हायरलच्या माध्यमातून अनेकांचं आयुष्य बदलून जातं. असंच एका तरूणांचं आयुष्य एका व्हिडीओमुळं बदलून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी पॅराग्लायडिंगचा (Para gliding) एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडीओत तरूण ‘मुझे निचे उतारो’ असं म्हणत होता.

उत्तर प्रदेशच्या बांदा येथे राहणारा विपीन कुमार (Vipin Kumar) हा एका व्हिडीओमुळं रातोरात स्टार (Star Of Viral Videos) झाला आहे. मित्रांसोबत पॅराग्लायडिंगसाठी विपीन गेला होता. त्याला कसलाही अनुभव नसताना तो मित्रांच्या आग्रहाखातर पॅराग्लायडिंग करण्यासाठी तयार होतो. पण अचानक तो आकाशात दुरवर गेल्यावर मोठ्या मोठ्यानं ओरडू लागतो की मुझे लॅंड करो दो त्याचा असं ओरडतानाचा व्हीडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

सध्या विपीन हा एखाद्या सेलिब्रिटीसारखा राहात आहे. त्या व्हायरल व्हिडीओनंतर विपीनला अनेक जाहिरातीेंच्या ऑफर आल्या. तसेच तो आता सध्या प्रत्येकी महिन्याला 25-30 लाख रूपयांचा व्यवसाय करत आहे. विपीन व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे. तो सध्या व्यवसायात सुद्धा यशस्वी होत आहे.

दरम्यान, विपीनच्या त्या व्हायरल व्हिडीओचे अधिकार सध्या एका प्रायव्हेट वापरकर्त्यांनी विकत घेतले आहेत. यातून विपीनला काही 10-15 लाख रूपये उत्पन्न मिळतं. विपीनच्या भित्रेपणावर मात करणारा तो व्हिडीओ विपीनला लखपती बनवून गेला हे नक्की.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या 

Omicron Variant चा लहान मुलांना धोका?; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

“2024 ला मोदीच सत्तेत येणार, लोकं मोदींवरच विश्वास ठेवणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More