मुंबई | देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. नुकतंच अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर आता अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना मलायकाची बहिण अमृता अरोरा हिने याबाबत माहिती दिली आहे. मलायकाडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अर्जुनलाही कोरोनाची लागण झाली असून तो इन्स्टाग्रावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “माझं हे सांगणं कर्तव्य आहे की मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी तब्येत बरी आहे आणि मला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत. डॉक्टरांच्या सल्लानुसार मी स्वतःला घरी आयसोलेट केलं आहे. सध्याचे काही दिवस कठीण असून तुमच्या प्रेमासाठी आणि सदिच्छांसाठी धन्यवाद.”
तर आता अर्जुननंतर मलायका अरोराला देखील कोरोनाची बाधा झाल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा टीव्ही शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवर 7 जणं पॉझिटिव्ह आल्याचं आढळलं होतं. यानंतर तातडीने शोचं चित्रीकरण बंद करण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या-
छोटा मासा गळाला लागलाय, रियाच्या भावाच्या अटकेनंतर शेखर सुमन यांची प्रतिक्रिया
…तर मी कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन- संजय राऊत
“भाजप ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात”
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांवर मोठी कारवाई; आतापर्यंत इतका दंड वसूल!
Comments are closed.