Malaika Arora | बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नेहमीच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात. दोघेही एकमेकांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात मलायकाने आज केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेता अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. पण, मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.
अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाची क्रिप्टिक पोस्ट
गेल्या 5 वर्षांपासून एकत्र वाढदिवस साजरा करणारे मलायका-अर्जुन आता विभक्त झाल्याचं म्हटलं जातंय. कारण, आज अर्जुनचा वाढदिवस असूनही मलायकाने त्याला शुभेच्छा देण्याऐवजी एक अजीब पोस्ट केली आहे.यामुळे चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे.’डोळे बंद केल्यानंतर आणि पाठ फिरवल्यानंतर विश्वास ठेऊ शकतो… अशीच लोकं मला आवडतात…’ असं अभिनेत्रीचं स्टेटस आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचा अंदाज बांधत आहेत.
अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा
इतकंच काय तर, काल मंगळवारी अर्जुनच्या घरी वाढदिवस असल्यामुळे पार्टी होती. वांद्रे येथील राहात्या घरी अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या पार्टीमध्ये मलायका गैरहजर होती. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन यांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 2019 मध्ये त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं. सध्या मलायका अरोरा ही 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वर्षाचा आहे. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षाचे अंतर आहे.
News Title – Malaika Arora Share Cryptic Post
महत्वाच्या बातम्या-
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर, मृताच्या आईचा संताप
“मुंबई से आया मेरा दोस्त…”, राशिद खानची रोहित शर्मासाठी पोस्ट
1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार; सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री?
“राजर्षी शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या”; ‘या’ नेत्याने केली मागणी
आनंदाची बातमी! वनप्लस कंपनीने लाँच केला भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन