Malaika Arora | बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडीलांचं (12) स्पटेंबर रोजी निधन झालं. आपल्या राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरुन त्यांनी उडी मारुन आयुष्य संपवलं अशी सगळीकडे चर्चा आहे. अनिल मेहता यांच्या मृत्यूने सगळीकडे एकच खळबळ उडाली. अनिल मेहतांच्या पोस्टमॉर्ट रिपोर्टमधून धक्कादायक माहीती समोर आली आहे.
अनिल मेहताची हत्या?
मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे कूपर रूग्णालयात पोस्ट मॉर्टम सेंटरमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलं. यावेळी प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण अनेक जखमा असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. अनिल मेहता यांचं बुधवारी रात्री आठच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आलं.
मलायकाच्या आईचा खुलासा-
मलायकाची (Malaika Arora) आई म्हणजेच जॉयस पॉलीकार्प यांनी अनिल मेहता हे नेहमी बाल्कनीत बसून पेपर वाचायचे. तसेच लिव्हिंग रुममध्ये त्यांची चप्पल होती. जेव्हा आम्ही बाल्कनीतून पाहिलं तेव्हा वॉचमन मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता असं म्हटलं. अनिल मेहता हे गेल्या काही काळापासून आजारी होते. गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, मात्र तेव्हा त्यांच्यावर नेमक कसले उपचार सुरू होते, याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.
सुसाईड नोट सापडली?
अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मलायकाच्या वडिलांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
News Title : Malaika arora’s father killed or suicide?
महत्त्वाच्या बातम्या –
मनोज जरांगेंचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर जोरदार हल्ला!
… तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा; ‘या’ नेत्याचं आवाहन
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?