सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर; 21 वर्षीय अभिनेत्रीचं निधन

malayalam actress nikita nair passes away at 21

Nikita Nair | सिनेसृष्टीतून (Film Industry) एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. एका अभिनेत्रीचे अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. या तरुण अभिनेत्रीच्या अचानक निधनामुळे (Sudden Death) मनोरंजनसृष्टीला (Entertainment Industry) मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून, सर्वजण अभिनेत्रीला (Nikita Nair) श्रद्धांजली (Tribute) अर्पण करत आहेत.

मल्याळम अभिनेत्री (Malayalam Actress) निकिता नायरचे निधन झाले. ती अवघी २१ वर्षांची होती. निकिता ही B.Sc सायकॉलॉजीची (B.Sc Psychology) विद्यार्थिनी होती.

आजारपणामुळे तिला कोची (Kochi) येथील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला विल्सन रोग (Wilson’s Disease) नावाचा एक दुर्मिळ आजार (Rare Disease) होता.

निकिता नायर (Nikita Nair) ही कोल्लम (Kollam) येथील करुणागप्पल्ली (Karunagappally) येथील रहिवासी होती. आजारपणामुळे तिच्यावर दोनदा यकृत प्रत्यारोपणाची (Liver Transplant) शस्त्रक्रिया करावी लागली होती. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिची आई नमिता माधवनकुट्टी (Namitha Madhavankutty) आणि वडील डॉनी थॉमस (Donny Thomas) यांना लेकीच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.

महाविद्यालयीन जीवनात होती सक्रिय

निकिता तिच्या महाविद्यालयीन जीवनात एक सक्रिय आणि प्रेरणादायी विद्यार्थिनी होती. तिच्या निधनामुळे महाविद्यालयात आणि तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एडप्पल्ली (Edappally) नेताजी नगर (Netaji Nagar) येथील तिच्या घरी तिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर निकिताच्या पार्थिवावर कोची येथे अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत.

Title : malayalam actress nikita nair passes away at 21

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .