“बायको हट्टला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये”
नवी दिल्ली | बायको हट्टाला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये आणि तिला मारहाण करावी, असा अजब सल्ला एका महिला मंत्र्यांने पुरूषांना दिला आहे. महिला मंत्र्यांच्या या सल्ल्यामुळे सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे.
सिती जैला मोहम्मद युसॉफ (Siti Zailah Mohd Yusoff) असं वादग्रस्त वक्तव्य केलेल्या या महिला मंत्र्यांचं नाव आहे. मलेशियाच्या या महिला मंत्र्याकडे महिला, कुटुंब आणि समुदाय विकास उपमंत्रीपद असल्याचं म्हटलं जात आहे.
‘जर पत्नी हट्टाला पेटली, आपले वर्तन बदलत नसेल तर पतीने तीन दिवस तिच्यासोबत झोपू नये. वेगळे झोपूनही तिचे वर्तन बदलले नाही तर पतीने कठोरपणा दाखवून तिला मारहाण करावी पण हे जास्त कठोर नसावं, यामुळे तिला कळेल की पतीला कोणते बदल हवे आहेत’, असा सल्ला या महिला मत्र्यांने पुरूषांना दिला आहे.
दरम्यान, इंस्टाग्रामवर ‘मदर टिप्स’ नावाने एक दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महिला मंत्र्यांच्या या अजब सल्ल्यानंतर काही संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
थोडक्यात बातम्या-
“किरीट सोमय्या म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर”
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
भरधाव बाईकची ट्रकला धडक; काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
“भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, त्यांचा दृष्टीकोनच तसा आहे”
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत
Comments are closed.