कुआलालंपुर | अनेक देशामध्ये मागील दोन महिन्यांपासून मॉल्स बंद आहेत. मात्र मलेशियामध्येही असाच एक 50 दिवसांपासून बंद असणारा मॉल पुन्हा सुरु झाल्यानंतर आतमधील परिस्थिती बघून तेथील दुकानदारांना धक्काच बसला आहे.
50 दिवस सर्व प्रकारचे उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवल्यानंतर मेलशियाने काही दिवसांपूर्वीच टप्प्या टप्प्याने देशातील सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पेनांग पुलाऊ टिकूसमधील मॉल 50 दिवसांनंतर सुरु करण्यात आला. उत्साहाने व्यापाऱ्यांनी मॉलमधील आपली दुकाने उघडली आणि त्यांना आतील परिस्थिती पाहून धक्काच बसला.
मॉलमधील अनेक दुकांनामधील कपड्यांना तसेच चामड्याच्या वस्तुंना बुरशी लागल्याचं दिसून आलं. मॉलमध्ये चामड्याच्या वस्तू विकणाऱ्या दुकानांमधील अनेक गोष्टींना बुरशी लागल्याचं चित्र पहायला मिळालं. अनेक दिवसांपासून मॉल बंद असल्याने दमट हवामानामुळे मॉलमधील चामड्याच्या वस्तुंवर बुरशी लागल्याने लाखो रुपयांच्या वस्तू खराब झाल्या आहेत.
दरम्यान, या वस्तू उच्च प्रतिच्या चामड्याच्या असल्याने तेल आणि विशेष प्रकारच्या क्लिनिंगनंतर त्या पुन्हा पुर्वीसारख्या होतील. मात्र यासाठी आता व्यावसायिकांना कष्ट घ्यावे लागणार आहे.
Fungus on branded stuff due to mall #Lockdown…#20lakhcrores pic.twitter.com/FYTiNvPvL7
— Pranav Parikh (@pranavgotiyo) May 12, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स
…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा
पावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ
पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…
Comments are closed.