मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी, मात्र सत्तास्थापनेत पेच

मालेगाव | मालेगाव महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही, मात्र याठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी झालीय. काँग्रेसला सर्वाधिक २८ तर राष्ट्रवादीला २६ जागा मिळाल्यात.

शिवसेनेला १३ जागा मिळाल्या असून त्यांच्या जागामध्ये दोनने वाढ झालीय. एकही जागा नसलेल्या भाजपने यावेळी ९ जागा पटकावल्यात. तर एमआयएमला ७ जागा मिळाल्यात. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत युती केलेल्या जनता दलाने काँग्रेससोबत जाणार नसल्याचं म्हटलंय, त्यामुळे याठिकाणी सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या