बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माळेगाव निवडणुकीच्या 7 जागांचा निकाल जाहीर

बारामती | बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील 21 जागांपैकी 7 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलनं बाजी मारली आहे.

अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने निकाल लागलेल्या 7 जागांमधील 6 जागांवर आपलं वर्चस्व राखलं आहे. पवारांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ने रंजन तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’चा धुळ चारणार असल्याच दिसत आहे.

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतल्यामुळे काही काळ मतमोजणी थांबली. त्यामुळे अद्यापही मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, या  निकालासह अजित पवार यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा राखली आहे. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवार 23 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

“…म्हणून ट्रम्प यांची मी निंदा करतो; त्यांनी त्वरीत माफी मागावी”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्जमाफीचा दुसरा टप्पाही लवकरच जाहीर करतील- बच्चू कडू

महत्वाच्या बातम्या-

‘सर्व ठिकाणी मराठी भाषा हवी’; शिवसेनेच्या ‘त्या’ पत्रावर अमित शहा म्हणाले…

फक्त सरपंचच नाही तर राज्याचा मुख्यमंत्रीही जनतेतून निवडायला हवा- अण्णा हजारे

…म्हणून डोनाल्ड ट्रम्प दारु आणि सिगारेटला हात लावत नाहीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More