बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

पुणे | माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शर्थीने सत्ता खेचून आणली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी 16 जागांवर विजय मिळाला आहे, तर सत्ताधारी चंद्रराव तावरेंच्या पॅनेलला अवघ्या पाच जागा मिळवण्यात यश आलं आहे.

अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच या कारखान्यावर विजय मिळवला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, असं अजित पवार म्हणाले होते.

माळेगाव साखर कारखाना पाच वर्षांपूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आले आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत विजयश्री मिळवत अजित पवारांनी 2015 च्या पराभवाचा वचपा काढला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

दिल्लीत हिंसाचार उसळला; एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू

फडणवीसजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या- 

धनंजय मुंडेंचं स्तुत्य पाऊल; रेल्वे ट्रॅकजवळ सापडलेल्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं

पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली, 50 कोटी वाटून सत्ता मिळवली- रंजन तावरे

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचं कामकाज तहकूब

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More