बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दोन एकर विकून पोराला शिकवलं पण पोराचा संयम ढासळला”

पुणे | महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही दिवसांपासून परिक्षा आणि विद्यार्थी या मुद्यावर संघर्ष चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून म्हाडा, टीईटी, आरोग्य भरती या परिक्षांमधील घोटाळे आता बाहेर यायला लागले आहेत. अशातच राज्याला हादरवून टाकणारी एमपीएसीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सतत परिक्षांच्या तारखा बदलत असल्यानं दौंड तालूक्यातील देऊळगाव गाडा येथील मल्हारी बारवकर या परिक्षार्थींनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन मल्हारीनं आत्महत्या केल्यानं स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मल्हारीच्या आत्महत्येन त्याचं कुटुंब कोसळलं आहे.

मल्हारीच्या वडीलांनी सराकारकडं आता आम्ही काय मागावं?, असा कळकळीचा प्रश्न केला आहे. मल्हारीच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी दोन एकर शेती विकली होती. सर्वकाही करूनही परिक्षा होत नाहीत या विचारानं तो सतत तणावात असायचा. तरीही अभ्यास करून अधिकारी होवून आई वडिलांना आनंदात ठेवायचं हे त्याचं स्वप्न होतं, त्याच्या आठवणी सांगता त्याची आई जनाबाई बारवकर यांनी टाहो फोडला होता.

दरम्यान, शेती विकली पण कोरोनामुळं परिक्षा झाली नाही तरीही तो अभ्यास करत होता. आता त्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्यानं आमचं सर्वकाही गेलं आहे. सरकारकडं आता आम्ही काय मागावं, असं मल्हारीचे वडिल उद्विग्नपणे सांगत होते.

थोडक्यात बातम्या 

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

‘शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे?’; रामदास कदम आक्रमक

“लग्नाला उशीर केल्यास मुली पाॅर्न पाहत बसतील, त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं”

“आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, अशा गर्वात राहू नये”

‘छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट आणि…’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More