बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मोदींच्या मंत्रिमडंळात कसा?”

मुंबई | मंत्री नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे एका ड्रग पेडलरसोबतचे फोटो शेअर करून पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. त्यातच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आता नरेेंद्र मोदींच्या मंत्रिमडंळात 10 वर्षे असलेल्या एका मंत्र्याचे दाऊदसोबत संबध होते, असा खुलासा केला आहे. शिवाय त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्यांनी लावलेल्या आरोपावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, वाजपेयींचं सरकार असताना पुरूषोत्तम सोलंकी हे नगरसेवक होते. त्यांच्यावर 1993च्या बॉम्बस्फोटानंतर गुन्हा दाखल करून टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर ते गुजरातला स्थलांतरीत झाले आणि अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले. त्यांचे दाऊद आणि छोटा शकील यांच्याशी संबंध होते, असा खुलासा मलिकांनी केला आहे.

मलिक पुढे म्हणाले, सोलंकींवर आमचं सरकार असताना कारवाई करण्यात आली होती. नंतर ते गुजरातला गेले आणि भावनगरमधून निवडून आले. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कॅबिनेटमध्ये पुरूषोत्तम सोलंकी 10 वर्षी मंत्री होते. त्यामुळे दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मंत्रिमंडळात कसा? हा प्रश्न सोमय्यांनी मोदींना विचारावा असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून नवाब मलिकांवर टीका करताना शरद पवारांवरही निशाणा साधला होता. सोमय्या म्हणाले होते. समीर वानखेडेचे बाप दाऊद नाही तर तुमच्या सरकारचे पालक असलेल्या शरद पवारांना विचारा की 1993मध्ये दाउदसोबत विमानात कोण बसलं होतं ते?, असा खोचक टोला सोमय्यांनी लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या जावयाच्या अटक प्रकरणातील मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, म्हणाला तो गांजा…

“आर्यन खानसोबत जे काही घडलं त्याचं एक आई म्हणून वाईट वाटतं”

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More