बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

मुंबई | मुंबई कार्ड्रेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या राज्यात चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

मीडिया समोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर न्यायालयामध्ये जा. त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये. आम्ही न्यायालयामध्ये उत्तर देऊ, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिलं आहे. नवाब मलिक हे राज्यातील आदरणीय मंत्री आहेत. त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. त्यांनी पुरावे असतील तर न्यायालयामध्ये सादर करावेत. फक्त मीडियाला सांगून प्रसिद्धी नका घेऊ. तसेच त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये, असा सल्ला यास्मिन वानखेडेंनी नवाब मलिक यांना दिला आहे.

ड्रग्स लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक यांनी आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या मागे ड्रग्स लॉबी असण्याची शक्यता आहे. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्स लॉबींनी प्रवक्ते म्हणून नवाब मलिकांना नेमलं असावं, असं यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला धमक्या येत आहेत. भीतीही वाटत आहे. आमचं काम काय आहे आणि आम्ही तुमच्याशी बोलत आहोत. आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हास जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असं यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मी 50 लाख रुपये पाॅलिथीन बॅगेतून घेतले आणि…’; प्रभाकर साईलचा मोठा खुलासा

शेअर बाजारात एलन मस्क मालामाल! एका दिवसात कमावले 27,15,00,00,00,000 रूपये

“नवाब मलिकांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांच्या सांगण्यावरूनच…”

शमीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात फेसबूकची मोठी कारवाई

“आमच्या जीवाला धोका, जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या येत आहेत”

1 Comment
  1. just click the up coming internet page

    “त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More