बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांना मोठा दणका! तब्बल आठ मालमत्तांवर ईडीची टाच

मुंबई | राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या अटकेत आहेत. सक्तवसूली संचनालयाने दाऊदशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये हात असल्याच्या कारणावरून मलिक यांना अटक केली आहे. तेव्हापासून ईडीनं मलिकांच्या अनेक ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

उस्मानाबाद येथील आणि मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड आणि कुर्ला पश्चिम येथील व्यवसायिक जागा ईडीनं जप्त केली आहे. ईडीकडून आतापर्यंत मलिक यांच्या 8 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील तब्बल 148 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. कुर्ला येथील तीन प्लाॅट्स देखील जप्त करण्यात आले आहेत. वांद्रे पश्चिम येथील 3 राहती घरं देखील ईडीनं जप्त केली आहेत. अनेक व्यवहारात अनियमितता आढळली असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, ईडीकडून मलिक यांना अद्यापी कसलाही दिलासा मिळाला नसल्यानं राज्यात त्यांच्या राजीनाम्याची मागणी चालूच आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राज यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, ते कोणाचे…”, चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं तोंडभरून कौतूक

राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर युक्रेनियन नौसैनिकांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता

मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More