बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गल्लीत क्रिकेट जिंकणारे आता वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत”

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचा (Sindhudurg state bank election) काल निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपने सरशी मारली आहे. या विजयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीला टोले लगावले होते. आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

“गल्लीत क्रिकेट जिंकणारे आता वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, अशा टोला मलिक यांनी राणेंना लगावला आहे. शिवाय देशात कोव्हिडचे संकट आहे. पंतप्रधान नियम पाळा असे सांगतात. पण भाजपचे नेते नियम पाळत नाहीत. तेच नियम तोडतात. निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव करू नक,” अशी टीकाही मलिकांनी यावेळी केली आहे.

“फर्जीवाड्याचा माझा लढा सुरु राहील. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. 18 कोटींची डिल 50 लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे? आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल,” असा इशाराही मलिकांनी दिला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. त्यामुळे काल राणे पितापुत्रांनी आघाडी सरकारला जोरदार टोलेबाजी केली होती. अज्ञातवासात असलेले नितेश राणे यांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली होती.

थोडक्यात बातम्या-

ओमिक्रॉननंतर आता ‘या’ नवीन विषाणूची दहशत, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

‘ही लक्षणं दिसली तरी…’; केंद्राच्या राज्यांना सूचना

“त्याच्या छाताडावर उभं राहून…”, मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

31st निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते बंद राहणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More