बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू

मुंबई | ‘भाबीजी घर पर है’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पण आता या मालिकेच्या सेटवर शोककळी पसरली आहे. या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दिपेश भान याचा काल क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळत असताना दिपेश भान अचानक कोसळले त्यांना लगेच दवाखान्यात नेलं. परंतु दिपेश भान यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

दिपेश भान हे 41 वर्षांचे होते. त्यांचं लग्न होऊन तीन वर्षे झाली होती. त्यांना एक मुलगा आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तसेच मालिकेच्या सेटवर आणि त्यांच्या चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्यासोबत एकत्र काम करणाऱ्या चारू मलिकने इंस्टाग्रामवर पोस्ट करत RIP यार तू गेलास, हे स्विकारणं कठीण आहे. तू आमच्या नजरेसमोरून गेलास, पण मनातून कधीच जाणीर नाही, असं म्हणत मलिक यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. कविता कौशिक यांनी लिहीलं आहे की, वयाच्या 41 व्या वर्षी दिपेश भान याच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. दिनेश यांच्या निधनाने मी खूप जास्त दु:खी आहे. एफआयआरमध्ये सगळ्यात जास्त फिट असलेला, त्याने कधीही धुम्रपान केलं नाही, कधीही मद्यपान केलं नाही. शरिराला हानिकारक असं काही केलं नाही.

‘भाबीजी घरपर है’ मालिकेतील त्याची मलखानची भूमिका लोकप्रिय होती. ‘ओरे मोरी मय्या’ हा त्याचा डायलॉग चांगलाच गाजला होता. पण आता त्याच्या जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

थो़डक्यात बातम्या- 

“शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना दगड डोक्यावर ठेवला की छातीवर?”

मोठी बातमी! जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचं वॉरंट

शिंदेंच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला मोठा गौप्यस्फोट!

“आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय”

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More