मुंबईच्या महिलेचे फेसबुकवरुन भय्यूजी महाराजांवर गंभीर आरोप

मल्लिका राजपूतने फेसबुकवर पोस्ट केलेले फोटो

मुंबई | इंदौरला भय्यूजी महाराजांचा विवाहसोहळा सुरु असताना इकडे मुंबईत एका महिलेने भय्यूजी महाराज यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मल्लिका राजपूत असं आरोप करणाऱ्या महिलेचं नाव आहे. फेसबूकवरुन तिनं हा आरोप केला आहे. 

दरम्यान, मल्लिकाने केलेले आरोप भय्यूजी महाराजांनी फेटाळले आहेत.  हे आरोप फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.