नवी दिल्ली | काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजस्थानमधील अलवर येथे एका सभेत लोकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना खरगेंनी भाजपवर (Bjp) टीकास्त्र सोडलं आहे.
आमच्या लोकांनी देशासाठी बलिदान दिलं, पण भाजपने देशासाठी कोणतं बलिदान दिलं आहे, असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला केला आहे.
आम्हाला चीनसोबतच्या सीमेवरील संघर्षावर सभागृहात चर्चा हवी आहे, परंतु सरकार चर्चेसाठी तयार नाही. तो बाहेर तर सिंहासारखा बोलतो पण प्रत्यक्षात तो उंदराच्या चालीने चालचो. आम्ही देशासोबत आहोत पण सरकार महत्त्वाची माहिती लपवत आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आह
आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय आणि देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिलं, असं सांगत खरगेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आम्ही देशासाठी जीव दिला बलिदान दिलं तुम्ही काय केलं?. तुमच्या घरातला कुत्रा तरी देशासाठी मेलाय का?. तुम्ही थोडा तरी त्याग केलाय का?, असा सवाल खरगेंनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-