बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसला 70 वर्ष दिली मला 5 वर्ष द्या, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचं काय झालं?”

नवी दिल्ली |  गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशात वाढत्या माहागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून काँग्रेसनं दिल्लीत पत्रकार परिषदे घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी काँग्रेसला 70 वर्ष दिली मला 5 वर्ष द्या, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करुन दाखवतो असं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वसनाचं काय  झालं?, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. त्यासोेबतच देशाच्या इतिहासातील सर्वात महाग पेट्रोल मिळत आहे. तर सिलेंडरवर मिळणारं अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून मिळालं नसल्याचं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

देशात आज अनेक ठिकाणी पेट्रोल 100 रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल विकलं जात आहे. प्रमुख शहर असलेल्या मुंबईतही पेट्रोल प्रतिलीटर 108 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. केंद्र सरकार इंधनाच्या किमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही. तो थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जात असल्याचं आरोप खर्गे यांनी केला आहे.

दरम्यान, एका वर्षात देशातील 98 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला खर्गेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नानांच्या आरोपावर अजित पवार संतापले; म्हणाले…

“पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे”

…..म्हणून केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवली

“योग्य माहिती अभावी नाना पटोलेंनी आरोप केले; सुरक्षा नको असेल तर तसं सांगावं”

शिवसेना नेते संजय राऊत रॉकस्टार- उर्मिला मातोंडकर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More