दरड कोसळण्याच्या शक्यतेने माळशेज घाट २ दिवस बंद

जुन्नर : माळशेज घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून २ दिवस माळशेज घाट मार्गे होणारी वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर यांनी ही माहिती दिलीय.

शनिवार आणि रविवार कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे परिसरातील हजारो पर्यटक माळशेज घाटात येतात. त्यांना घाटात जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारून वाहने रोखण्यास सुरुवात केली आहे.