बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तेव्हा साहेबांच्या खिशातल्या पेनाची शाई संपली होती का?’; राम सातपुतेंची रोहित पवारांवर टीका

मुंबई | कोरोनाचं संकट डोक्यावर असतानाच केंद्र सरकारने खताच्या किंमती वाढवल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यानंतर केंद्र सरकारने नमती भूमिका घेत खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांसह इतर नेत्यांना श्रेय देणारं एक ट्विट केलं होतं. यावर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी कडाडून टीका केली आहे.

काही चांगलं झालं की साहेबांनी केलं. शेतकऱ्यांची वीज तोडली तेव्हा साहेबांच्या खिशातील पेनाची शाही संपली होती का?, असा प्रश्न राम सातपुते यांनी रोहित पवारांना विचारला आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली तेव्हा का नाही ठाकरे सरकारला पत्र लिहिलं? रोहित पवार आता फुकटचे गुणगान गायचे आणि पोकळ श्रेय गळ्यात पाडून घ्यायचे दिवस आता गेले आहेत. आपलं Software अपडेट करून घ्या, अशी टीका आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

देशभरातील शेतकऱ्यांचा दबाव आणि आदरणीय शरद पवार साहेबांसह अनेकांनी याबाबत केंद्र सरकारला पत्र दिल्यामुळं त्याची दखल घेत अनुदानात वाढ करून खतांच्या किंमती पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनापासून आभार! यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं होतं.

दरम्यान, दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली होती. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे, अशी टीका देखील शरद पवार यांनी केली होती.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

महिला क्रिकेटपटूच्या मदतीला विराट कोहली धावला; केली ‘इतक्या’ लाखांची मदत

मुल होत नाही म्हणून पतीने उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने अधिक

अंधश्रद्धेचा कहर ! कोरोना रोखण्यासाठी 7 लाखांची पुजा, खंडीभर बोकडांचे बळी अन्…

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More