बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बरेच दिवस अच्छे दिनची वाट पाहिली, आता सच्चे दिन दाखवण्याची गरज”

नवी दिल्ली | माझे सर्वच विरोधी पक्षनेत्यांशी चांगले संबंध आहेत. जर राजकीय वादळ उठलं तर त्याला कोणीच रोखू शकणार नाही. आता ‘खेला होबे’ची ललकार संपूर्ण देशात ऐकायला मिळेल. बरेच दिवस अच्छे दिनची वाट पाहिली. आता सच्चा दिन दाखवण्याची गरज आहे. ते आम्हीच पूर्ण करू, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मी भेट घेणार आहे. तसेच लालूप्रसाद यावद यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. सर्व लोक एकत्र यायला तयार आहेत. विरोधकांनी एकत्र यावं असं सोनिया गांधी यांनाही वाटतं. त्यांच्याशी भेट घेऊन यावर चर्चा करणार आहे. विरोधकांनी एकत्र येण्यावर गंभीरपणे विचार केला तर सहा महिन्यातच त्याचे परिणाम दिसतील, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्यात.

पेगासस हा एक खतरनाक व्हायरस आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. संसदेचं काम सुरू नाही. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. सध्या तरी आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोणी त्याचं नेतृत्व करत असेल तर मला काहीच अडचण नाही. माझं मत कुणावर मला थोपवायचं नाही. अजून अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. संसदेच्या अधिवेशनानंतर सर्व राजकीय पक्षांशी मी स्वत: बोलणार आहे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

…अन् आराध्या बच्चनने अभिषेकऐवजी रणबीरला कपूरला बाबा म्हणून मारली मिठी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More