बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नरेंद्र मोदी माझ्यावर जळतात’; ममता बॅनर्जी संतापल्या

नवी दिल्ली | रोममध्ये मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विश्व शांती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. इटलीच्या सरकराने ममता बॅनर्जींना आमंत्रित केलं होतं. निमंत्रण मिळाल्यानंतर ममतादीदींनी रोमला जाण्याची तयारीही केली होती. मात्र  या कार्यक्रमात ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत.

केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांना या कार्यक्रमास जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. मोदी माझ्यावर जळतात. त्यामुळेच त्यांनी मला रोमला जायची परवानगी नाकारली आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली  आहे.

मी काही विदेशात फिरायला जात नाही. हा देशाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता. रोमने दोन महिन्यांपूर्वीच मला संपर्क साधला होता. भारत आणि बांगलादेशींना इटलीत बोलावलं जात नव्हतं. तरीही त्यांनी मला रोमला येण्याचं विशेष आमंत्रण दिलं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने ही परवानगी नाकारली, असं ममता बॅनर्जी म्हणाल्यात.

तुम्ही मला थांबवू शकत नाही. परदेशात जाण्यास मी उत्सुक नाहीये. मात्र, या दौऱ्याचा संबंध राष्ट्र सन्मानाशी होता. तुम्ही नेहमी हिंदूंबाबत बोलता. मीही एक हिंदू महिला आहे. तरीही तुम्ही मला परदेशात जाण्यास परवानगी का नाकारली आहे?, असा सवाल त्यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

“संज्या ते पवार कुटुंब आहे, शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील”

“हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात मग सोनिया गांधी पंतप्रधान का बनू शकत नाहीत?”

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय- नरेंद्र मोदी

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More