बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंच्या तब्येतीसाठी ममता बॅनर्जींची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; दिला ‘हा’ नवा नारा

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) या मंगळवारपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होत्या पण उद्धव ठाकरेंच्या तब्येतीच्या कारणामुळे ही भेट रद्द झाली.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत पोहोचताच सिद्धिविनायकाचं (Siddhivinayak) दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यावर ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक नवा नारा दिला.

उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करायला मी सिद्धिविनायकाकडे आले असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तर दर्शनासाठी मला खुप चांगली सुविधा दिली, मला खुप बरे वाटले म्हणत ममता बॅनर्जींनी ‘जय मराठा, जय बांग्ला’ असा नारा दिला.

सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र सरकारचे आभारही मानले. गोवा राज्याची आगामी निवडणूक तसेच राज्यातील सध्याच्या घडामोडी या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More