बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गड आला पण सिंह गेला!, नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव

कोलकाता | पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची लढाई ममता बॅनर्जी हारल्या आहेत

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढाईमध्ये एकेकाळचे सहकारी राहिलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला आहे.

सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत 2700 मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले.

दरम्यान, पाचही राज्यांच्या मतमोजणी सुरु होऊन 5 तासांचा वेळ झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये डाव्या पक्षांची एलडीएफ, आसाममध्ये भाजप, पुद्दुचेरीत एनडीए आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम”

चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा- प्रकाश राज

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झाला पराभव- चंद्रकांत पाटील

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज ठरला खरा, दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More