बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘Sharad Pawar युपीएचे नेते होणार का?’, ममता बॅनर्जी म्हणतात…

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) या मंगळवारपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होत्या. मात्र, प्रकृतीमुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममतांची भेट घेतली. अशातच ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील सिल्वर ओकवर (Silver Oak) भेट घेतली आहे.

काँग्रेस वगळून देशाच्या राजकारणात एक वेगळी पर्यायी आघाडी उभारण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसला डच्चू देत देशात नवी आघाडी तयार होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं एक जुनं नातं आहे. हे नातं अधिक सकस होण्यासाठी मी मुंबईत आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी पत्रकरांशी बोलत होत्या. त्यावेळी शरद पवार युपीएचे नेते (Sharad Pawar is the leader of UPA) होणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी भडकल्याचं पहायला मिळाल्या. ‘काय युपीए युपीए करता. युपीए (UPA) नाहीये आता’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला आगामी लोकसभेत डच्चू देणार असल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपसमोर आव्हान उभं करणं शक्य आहे का असा सवाल देखी ममतांना विचारण्यात आला होता.  आम्हाला देखील वाटतं सर्वांनी एकत्र यावं, एक मजबूत पर्याय उपलब्ध असायला हवा, असंही ममता म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकार अपशकुनी, फडणवीस सरकारनं मिळवलेलं Maratha Reservation घालवलं”

IPL Retention: कहीं खुशी कहीं गम, वाचा रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

“वीज फुकटात तयार होत नाही, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”

“Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रसुद्धा…”, ममता बॅनर्जींना खात्री

“अयोद्धा-काशी जारी है, मथुरा की अब तैयारी है”

“भंगार Nawab Malik स्वतःला डिटेक्टीव्ह करमचंद समजायला लागलाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More