बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत”, भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलचं तापलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती, असं पाल यांनी म्हटलं आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं, टीएमसीने म्हटलं आहे.

मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपसाठी काम करत आहे. डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी फक्त अधिकारी कुटुंबच उभं राहिलं होतं. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी अशी हिंमत करणार नाही, असं देखील पाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केशियारीमध्ये भाजप कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. घरात घुसून झोपलेल्या भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली, असं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

ठाकरे सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट; निलेश राणेंचा गंभीर आरोप

दिपाली चव्हाण यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारचा झटका, केली ही कारवाई!

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!

शेवटी प्रेम ते प्रेमच! पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीनेही सोडले प्राण

‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More