Top News राजकारण

ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी

नवी दिल्ली | तृणमूल काँग्रेसचे माजी नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. भाजपात प्रवेश केल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केलीये.

सुवेंदू अधिकारी म्हणाले, “ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीयेत. मला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागलंय. ज्या नेत्यांनी मला तेव्हा त्रास दिला होते ते आता पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करतायत.”

“मात्र आता मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो. ते म्हणजे, 2021 मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही,” असंही सुवेंदू अधिकारी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्या भाजपातील प्रवेशानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय. शहांनी बॅनर्जींवर टीका करत ही सुरूवात असल्याचं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

कसोटीतील पराभवानंतर शास्त्रींना हटवून ‘या” माजी खेळाडूची प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी

99.9 टक्के नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाला पसंती!

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या