बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे.

5 मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, 6 मे रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी आज संध्याकाळी राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी पक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती त्या राज्यपालांना देणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची तपसिया इथल्या पक्षाच्या कार्यालयात आज बैठक घेतली. या बैठकीला टीएमसीचे खासदार आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि निवडणुकीचे रणनितीकार प्रशांत किशोर उपस्थित होते.

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नये, जल्लोष करू नये, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी सर्व आमदार, नेते, कार्यकर्त्यांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला…’; अदर पुनावाला यांनी दिलं स्पष्टीकरण

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का! फर्जंद, फत्तेशिकस्तमधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

‘ …तर CT-SCAN करू नका’, एम्सच्या संचालकांनी दिला महत्वाचा सल्ला

“टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा”

परमबीर सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; क्रिकेट बुकिकडून ‘इतके’ कोटी रूपये उकळल्याचा आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More