बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारदा स्टींग प्रकरणी ममता बॅनर्जींचं उच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल

कलकत्ता | नारदा स्टिंग प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते वादाच्या घेऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं देखील नाव समोर आलं होतं. 9 जून रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने याप्रकरणी ममता बॅनर्जी यांचे उत्तर प्रतिज्ञापत्र स्विकारण्यास नकार दिला होता. यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कलकत्ता उच्च न्यायालयात ममता बॅनर्जी यांनी नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

नारदा वृत्त वाहिनीच्या मॅथ्यू सॅम्युएलने 2014 मध्ये एक स्टींग ऑपरेशन केले होते. ज्यामध्ये तृणमूल कॉंग्रेसचे मंत्री, खासदार आणि आमदार एका कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेताना दिसले होते. 2016च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपुर्वी ही क्लीप व्हायरल झाली होती. यानंतर कलकत्ता उच्च न्यायलयाने 2017 मध्ये सीबीआयला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते

दरम्यान,  नारदा स्टिंग प्रकरणी पश्चिम बंगालचे दोन मंत्री, एक आमदार आणि कोलकत्त्याचे माजी महापौर यांना सीबीआयने अटक केली होती. हे लोक सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. याप्रकरणी गेल्या महिन्यात कलकत्ता उच्च न्यायालयातील एका न्यायाधिशांनी सरन्यायाधिशांना लिहिलेल्या कथित पत्रात न्यायालय व अन्य न्यायाधिशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पत्रात त्यांनी चुकीच्या वर्तनुकीचा आरोप करत कोर्टावर गंभीर टीका केली होती. न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा आपल्या पत्रात म्हणाले होते की, उच्च न्यायालयाला एक विनोद बनवलं आहे. याने सर्व न्यायपालिकेला आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल- भाजप

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

निशाने करण मेहराच्या परिवारावर केला गुन्हा दाखल, धक्कादायक कारण आलं समोर

“राज्य सरकार कोरोनाची दहशत पसरवत जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी लादत आहे”

‘विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं हा तसाच प्रकार’; नाथाभाऊंचं फडणवीसांवर टीकास्त्र

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More