Loading...

पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा दहावीपर्यंत अनिवार्य होणार!

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये दहाव्या इयत्तेपर्यंत बंगाली भाषा अनिवार्य करण्याचा ममता बॅनर्जी सरकारचा विचार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांचाही यामध्ये समावेश केला जाणार आहे.

पश्चिम बंगाल सरकार यासंदर्भात नियम तपासून पाहात आहे. मंत्रिमंडळाची मान्यता किंवा स्वतंत्र विधेयक करावे लागेल का, यासंदर्भात माहिती घेण्याचं काम सुरु असल्याचं चॅटर्जी यांनी म्हटलंय.

Loading...