बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. केंद्रातील भाजप सरकारविरोधात देशातील अनेक विरोधी पक्षांनी एकवटण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी देखील केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

भवानीपूरच्या जग्गू बाजारातील प्रचार सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, केवळ बंगालच नाही तर इतरही राज्ये येत्या काळात विजयाची नोंद करतील. सध्या तृणमूल काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो बाहेरील लोकांसमोर न झुकता संपूर्ण ताकदीने लढाई लढत आहे.

तसेच आपण आता त्रिपुरा आणि आसामला देखील पोहोचलो आहोत. येत्या काही दिवसांत गोव्याला देखील जावू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ममता बॅनर्जी अधिक लोकप्रिय आहेत. सध्या अशी बरीच राज्ये आहेत जी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार आहेत, असं अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी या निवडणुकीत यश संपादन करणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी जग्गू बाजारातील प्रचार सभेला संबोधित करत होते.

थोडक्यात बातम्या –

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

हर्षल पटेलची हॅट्रिक! हार्दिक, पोलार्ड आणि राहुलला दाखवला घरचा रस्ता

बंगळुरूचा राॅयल विजय! मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी दारूण पराभव

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More