बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

कोलकाता | यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मात्र या बैठकीसाठी त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तब्बल अर्धा तास वाट पहावी लागली. या बैठकीला राज्यपाल जगदीप धनखडही उपस्थित होते.

मिटिंगमध्ये आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेच केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे चक्रीवादळामुळे झालेल्या 20 हजार कोटींच्या नुकसानीचा रिपोर्ट दिला. त्यानंतर दुसऱ्या मिटिंगला जायचं सांगून त्या मिटिंगमधून निघून गेल्या.

या घटनेवर राज्यपाल धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघर्षाचा हा पवित्रा राज्य आणि लोकशाहीच्या हिताचा नाही. मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचं बैठकीत भाग न घेणं संवैधानिकता वा कायद्याच्या शासनानुरुप नाही, असं ट्विट धनखड यांनी केलं आहे.

दरम्यान, हिंगलगंज आणि सागरमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर मी कालाईकुंडा येथे पंतप्रधानांना भेटले. त्यावेळी त्यांना पश्चिम बंगालमधील परिस्थितीची माहिती दिली. माहितीसाठी त्यांना आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल दिला आहे. आता मी दीघा येथे मदत कार्य आणि पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी जात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

DNB मेडिसीन परीक्षेत औरंगाबादमधील विद्यार्थ्याचं दैदीप्यमान यश!

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डाॅक्टर्सला व्हिडीओच्या माध्यमातून ‘मनापासून साॅरी’, पाहा व्हिडीओ

सेल्फीसाठी काहीही! आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी महिलेने मारले चक्क साडीतच पुशअप्स, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! कोरोनापासून वाचण्याचा उपाय सांगत त्यानं खाल्ला साप अन्…..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More