बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; ममतांच्या ‘या’ मागणीवर मोदी म्हणाले ‘मी बघतो’

मुंबई | गेल्या दोन वर्षात भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. या काळात भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. अखेर 2 मे रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये वातावरण शांत होताना दिसत आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रथमच ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तर त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या या काँग्रेस भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ही केवळ एक औपचारिक भेट असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. या भेटीत कोरोना रूग्णसंख्या, लसीकरण आणि कोरोना रूग्णांना लागणाऱ्या औषधांचा मुद्दा उपस्थित केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगालचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. पश्चिम बंगालचं नाव बदलून ‘बांगला’ असं करण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालच्या विधानसेभेत याबद्द्लचा ठराव देखील पास करण्यात आला आहे. त्याविषयी देखील मोदींशी चर्चा झाल्याचं ममतांनी सांगितलं, तर मोदींनी त्यावर ‘मी बघतो’ असं सकारात्मक उत्तर देखील दिलं आहे.

थोडक्यात बातम्या

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र; केलं ‘ही’ मोठी मागणी

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना दिलासा; करणार इतक्या हजार कोटींची मदत

‘या’ लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…; अभ्यासातून चिंताजनक माहिती समोर

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

‘भारत जातीवादाने नाही तर वर्णभेदानेही बाधित आहे’; मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More