बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममतांचा जलवा कायम! भाजपला धूळ चारत पुन्हा गड राखला

कोलकाता | देशाच्या केंद्रस्थानी सत्तेत असलेल्या भाजपचा विजयाचा वारू रोखण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. जम्मूपासून केरळपर्यंत भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र यामध्ये सर्वात मोठं नावं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं येतं. ममतांनी विधानसभेत भाजपला एकतर्फी पराभूत केलं होतं.

देशातील महत्त्वाची महापालिका म्हणून कोलकाता महापालिकेला ओळखण्यात येतं. पश्चिम बंगालच्या सर्वांगीण विकासाची सुत्र येथूनच हालतात. या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपसह काॅंग्रेसनं प्रयत्न केले होते. आज कोलकाता महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये टीएमसीनं आपली एकहाती सत्ता कायम ठेवली आहे.

कोलकाता महापालिकेच्या एकूण 144 जागांपैकी तब्बल 134 जागांवर टीएमसीनं विजय मिळवला आहे. ममता यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जात होती. 2015 मध्ये झालेल्या कोलकाता महापालिका निवडणुकीत टीएमसीला 124 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा अधिक जागा जिंकत ममता यांनी बंगालवर त्यांचीच पकड राहणार आहे हे दाखवून दिलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचं म्हटलं आहे. तरीही बंगालच्या जनतेचा कौल सर्वांना मान्य तर करावाच लागणार आहे.

थोडक्यात बातम्या 

सावधान! गुगलवर ‘या’ 5 गोष्टी शोधाल तर थेट जेलमध्ये जाल

पोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रुपये

“इथं कोणी ‘शहेनशहा’ टिकला नाही तर बाकी ‘शहांची’ काय गोष्ट”

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; ‘या’ 10 मुद्द्यावरून अधिवशेन गाजणार?

“170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा पोकळ, ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More