बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध भारत असेल- ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काँग्रसे अध्यक्षा सोनिया गांधी यांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

2024 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, असा सवाल ममता यांना पत्रकारांनी केला. यावर, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. राजकारणात समीकरणं बदलत असतात. आता विरोधकांना एकत्र येणं गरजेचं आहे. 2024 च्या निवडणुकीत आम्हाला आशा आहेत. पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, असं उत्तर ममता बॅनर्जी यांनी दिलं.

10 जनपथ मार्गावरील निवासस्थानी सोनिया गांधी यांची भेट घेतली. जवळपास दीड तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. या भेटीवेळी तिथे काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित असल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान त्यांनी पेगॅसस आणि कोरोना स्थितीवर भाष्य केलं असल्याचंं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचा विधानसभेतील घवघवीत यशानंतरचा पहिला दिल्ली दौरा आहे. ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. ममता यांच्या वक्तव्यावर भाजपची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारचा मोठा निर्णय! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात

‘धीर तरी कसा देऊ’; चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर असताना उर्मिला मातोंडकरांना पैसे देताना अश्रू अनावर

“शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत”

बाबो! प्रशिक्षकाने मॅच अगोदर महिला खेळाडूच्या लावली कानशिलात; टोकियो ऑलिम्पिकमधील व्हिडीओ व्हायरल

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More