ममता बॅनर्जींचं अर्थमंत्री अरुण जेटलींना दुसरं पत्र…

दिल्ली । पंजाब नॅशनल बॅकेच्या सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या फसव्या व्यवहारातून सरकारने आता तरी धडा घ्यावा, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांना पत्र लिहिलं. त्याचबरोबर FRDI बिल काढून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, माझे सरकार जनतेला नेहमीच वचनबद्द राहिले आहे. त्यामुळे सामान्य ठेवीदारांच्या भल्यासाठी आम्ही या बिलाचा विरोधच करू, असंही त्या म्हणाल्या.

तसेच, सामान्य ठेवीदारांच्या भल्यासाठी आणि संरक्षणासाठी कोण जबाबदार आहे? असा प्रश्नही त्यांनी पत्रात उपस्थित केला आहे.