बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप हा फेकू लोकांचा पक्ष आहे- ममता बॅनर्जी

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजप हा फेकू लोकांचा पक्ष आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली आहे.

भाजपवाले लोकांना बंदुका आणि गोळीचा धाक दाखवून धमक्या देतात आणि धर्माच्या आधारे देशाची विभागणी करतात, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.

गद्दारो को गोली मारो…असं वक्तव्य भाजपचा एक नेता आणि केंद्रीय मंत्री करतो. या वक्तव्यानंतरही त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही आणि तो घटनात्मक पदावर कायम राहतो ही भाजपची कार्यसंस्कृती आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

दरम्यान, मी अशा हिंदुस्थानात जन्माला आलो. ज्या देशावर भाजपचं राज्य नव्हतं याचं मला समाधान आहे, असंही ममत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

…तर देशातले तरुण पंतप्रधान मोदींना घरा बाहेर पडू देणार नाहीत- राहुल गांधी

…नाहीतर राजीनामे देऊ; शिवसेना नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंना इशारा

महत्वाच्या बातम्या- 

जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढणं ही मोदींची सर्वात घातक चूक- इमरान खान

अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका; रस्त्यांवर पायी चालण्याची वेळ

“भाजपकडे गोळी, बिर्याणी आणि दहशतवाद याच्याशिवाय सांगायला काहीच नाही, लाज वाटली पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More