बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी”

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचारादरम्यान टीकेची झोड उठवली आहे. देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. त्यातच ममता बॅनर्जींनी कोरोनाची दुसरी लाट ही मोदी निर्मित ट्रॅजेडी असल्याचा घणाघात केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यादरम्यान, दावे प्रतिदावे आणि टीका प्रति टीका होत असताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आपल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत देशात कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी आहे, असं म्हटलं.

ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयंकर आणि वेगवान आहे, याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी असं म्हणते. कारण, देशात इंजेक्शन उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही आणि देशात कमतरता असतानाही औषध आणि लसी या बाहेर देशात पाठवल्या जात आहेत.

या दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लक्षणे नसल्यास नागरिकांनी घरातच राहून उपचार घ्यावेत तसेच मतदानाला येताना हलकी लक्षण असलेल्या रुग्णांनी संध्याकाळी सहानंतर मतदान करावे त्याबरोबरच डावे काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांना मत दिल्याने भाजपची बाजू मजबूत होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

“आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण…”, नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रया; म्हणाले…

“मम्मी बरी झालेली, पण ॲाक्सिजन संपला अन् फडफड कोंबडीवाणी मेली ती”

…म्हणून पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्याच पत्नीवर झाडली गोळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More