Top News

…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जी

कोलकाता | बीजेपीच्या वाईट कारभारावर शांत रहण्याऐवजी अथवा ते सहन करण्याऐवजी, जेलमध्ये राहणे पसंत करेल, असं वक्तव्य श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय.

ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत. अथवा सत्ता सोडावी, असं ममता बॅनर्जी म्हणाल्यात.

भाजपला बाहेरील लोकांचा पक्ष म्हणत बंगालमध्ये कधीही भगव्या पक्षाचा कब्जा होऊ देणार नाही, असं ममता बॅनर्जीनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अधिकारांवर घाला घातल्यानंतर सत्तेत राहणं योग्य नाही, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

दरम्यान, आम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास, पुढच्या वर्षी जून महिन्यानंतरही मोफत रेशन देण्यात येईल, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”

केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका- देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक!

“संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा?”

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्वाचा आहे- बच्चू कडू

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या