…नाहीतर एका सेकंदात भाजप कार्यालयावर करु शकते कब्जा!

…नाहीतर एका सेकंदात भाजप कार्यालयावर करु शकते कब्जा!

कोलकाता | मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान जाळपोळ आणि फोडाफोडी झाली होती. याचा निषेध करत भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती.

ममता बॅनर्जी यांनी यावर पलटवार केला असून कडक शब्दांत सुनावलं आहे. तुमचं नशिब चांगलं म्हणून मी शांत बसले आहे, नाहीतर एका सेकंदात दिल्लीतील भाजप कार्यालय आणि तुमच्या घरांवर कब्जा केला असता, असं त्या म्हणाल्या आहेत.

अमित शहा देव आहेत काय, ज्यांच्यासमोर आंदोलन करु शकत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, तृणमूल आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला असून निवडणूक संपपर्यंत तरी हा वाद संपण्याचे चिन्ह नाहीत.

महत्वाच्या बातम्या

-‘त्या’ वक्तव्याप्रकरणी कमल हसन यांच्यावर गुन्हा दाखल

-मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या सरकारसोबत मी जाईन- हर्षवर्धन जाधव

-ईव्हीएमबाबत शंका नाही; अजित पवारांचा शरद पवारांना घरचा आहेर

-राहुल गांधींमुळे सलूनवाल्याची उधारी झाली बंंद!

-पोस्टर बॉईज; धोनीच्या कट्टर समर्थकांचा मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश!

Google+ Linkedin