जीएसटी म्हणजे ‘ग्रेट सेल्फिश टॅक्स’, ममता बॅनर्जींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली | जीएसटी म्हणजे  ‘ग्रेट सेल्फिश टॅक्स’ असं नामकरण करुन तृणमूल काॅंग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय.

जनतेला त्रास देण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि व्यवसायांना हानी पोहचवण्यासाठीच जीएसटी लागू करण्यात आलाय, असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

दरम्यान, नोटाबंदीला विरोध दर्शवण्यासाठी ट्विटर वापरणाऱ्यांना डिस्पले पिक्चर काळा ठेवण्यास ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय.