केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला

अंबरनाथ| संविधान गौरव दिनानिमित्त शनिवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे अंबरनाथला नेताजी मैदानावर आले होते. कार्यक्रम संपवून मंचावरून खाली उतरत असताना आठवलेंवर अचानक हल्ला झाला. प्रविण गोसावी असं या हल्ला केलेल्या तरूणाचं नाव आहे. 

घडल्या प्रकारामुळे कार्यकर्ते संतप्त झाले, आणि त्यांनी तरूणाला बेदम चोप दिला. अंबरनाथ पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत तरूणाला ताब्यात घेतले.

यानंतर पोलीसांनी त्याला मध्यवर्ती रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर पुढील उपचार चालू आहेत.

दरम्यान, रामदास आठवले सुरक्षित असून त्यांना कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही. 

महत्वाच्या बातम्या-

“मोदींच्या अरेरावीला कंटाळूनच मी भाजप सोडलं”

-ज्यांच्या हाती सत्तेची चावी, त्यांच्याच कार्यालयात चौथ्यांदा चोरी

-“राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू”

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेतं

-“त्यावेळी गडकरी एवढंच बोलले… मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात”

Google+ Linkedin