Top News

खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार

बीड | 23 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात जाऊन थेट तलवारीने वार केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

30 डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास आरोपी पोपट बोबडे हा रामनगर येथील पीडित मुलीच्या घराजवळ गेला होता. मुलगी किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी गेली होती. त्याच ठिकाणी दबा धरून बसलेला आरोपी पोपट बोबडे याने मुलीला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी घाबरलेल्या अवस्थेत धावत घरी पोहोचली.

आरोपीने घरात जाऊन माझ्याशी का बोलत नाहीस म्हणून तिच्यावर तलवारीने हल्ला चढविला. त्याने थेट मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने वार चुकविल्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

थोडक्यात बातम्या-

जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

भारतीय संघाच्या खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही; बीसीसीआयचा दावा

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटीसही सोबत येतात- रूपाली चाकणकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या