पोलिसांच्या कुत्र्याला चावणाऱ्या व्यक्तीला अटक

न्यू हॅम्पशायर | पोलिसांच्या कुत्र्याला चावणं एका व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलंय. अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर पोलिसांनी त्याला अटक केलीय.

न्यू हॅम्पशायरच्या बॉस्कोवाईन गावात गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांविरुद्ध वॉरंट काढलं होतं. पोलीस त्यांना पकडायला गेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

या सगळ्या गोंधळात कुत्रा आणि आरोपींमध्ये झटापट झाली. आरोपीने कुत्र्याचा चावा घेतला. दरम्यान, पोलिसांनी आता अटकेला विरोध करणे आणि पोलिसांच्या कुत्र्याला चावण्याच्या आरोपाखाली या व्यक्तीला अटक केलीय.