Top News

माण-खटावमध्ये गोरे बंधूंच्या भांडणात प्रभाकर देशमुखांचा लाभ?

Loading...

सातारा | माण-खटाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत असून ही महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढतींपैकी एक लढत आहे. इथं दोन भावांच्या भांडणात माजी आयएएस अधिकारी आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांची सरशी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपच्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांचं काम केलं आणि त्यांच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. विधानसभेला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन तिकीट मिळवलं. दुसरीकडे त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या एबी फॉर्मवर अर्ज भरला. त्यामुळे इथं दोन्ही बंधू पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

Loading...

दुसरीकडे ‘आमचं ठरलंय’ गटातील राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. सर्वपक्षीय उमेदवार त्यांच्यासोबत एकवटले आहेत. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी ‘आमचं ठरलंय’ गटातील काही इच्छुकांनी अर्ज मागे घेतल्यानं देशमुखांना बळ मिळाल्याचं मानलं जातंय.

माण-खटावमध्ये गोरे बंधूंच्या रुपानं शिवसेना-भाजपच्या मतांचं विभाजन होणार आहे. तर देशमुखांच्या रुपाने एक नव्या दमाचा आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेला उमेदवार माण-खटावकरांना मिळाला आहे. त्यामुळे गोरे बंधूंना धक्का देत देशमुख माण-खटावचे आमदार झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशा चर्चा आता मतदारसंघात रंगू लागल्या आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या